Breaking

Friday, 4 February 2022

Shyamchi Aai Book in Marathi PDF (फ्री Download) श्यामची आई' फ्री pdf डाऊनलोड.

Shyamchi Aai Book Review in Marathi


Shyamchi Aai Book in Marathi- मित्रांनो 'श्यामची आई' एक असे पुस्तक आहे जे आईवरील प्रेम आणि आईचे मुलांवरील प्रेम उत्कृष्ट कथनाने दर्शविते. ह्या पुस्तकास स्वतंत्र सेनानायी साने गुरुजी म्हणजेच पांडूरंग सदाशिव साने ह्यांनी लिहिले. आज आपण ह्याच पुस्तकाविषयी माहिती पाहणार आहोत. चला तर पाहुयात!



Shyamchi Aai Book in Marathi PDF
Shyamchi Aai Book in Marathi PDF






Shyamchi Aai Book information in marathi- shyamchi aai पुस्तकाविषयी थोडक्यात माहिती


श्यामची आई हे साने गुरुजींचे आत्मकथन आहे. हे पुस्तक मुख्यत: मराठी भाषेत लिहिले गेले आहे. ह्यावर एक फिल्म देखील तयार केली गेली आहे. साने गुरुजी शिक्षणासाठी वस्तीगृहात असताना त्यांचा मित्रांना गोष्टी सांगत असत, त्या गोष्टींत त्यांच्या आईची मुख्य भूमिका असे. त्यावरच हे पुस्तक आधारित आहे. 



कोण होते साने गुरुजीं? (shyamchi aai book writer in Marathi)

पुस्तकाविषयी माहिती घेण्याअगोदर आपण लेखकांविषयी थोडक्यात माहिती पाहूया! साने गुरुजींचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड ह्या गावी दि. २४ डिसेंबर १८९९ ला झाला. त्यांचे संपूर्ण नाव हे ‘पांडुरंग सदाशिव साने’ असे होते. बालपणात आईचे चांगले संस्कार ह्यामुळे त्यांना जीवनात चांगले व्यक्ति म्हणून घळण्यास मदत झाली. त्यांच्या आजोबांच्या जीवंतपणी त्यांचे कुटुंब हे श्रीमंत समजले जात असे. परंतु त्यानंतर सदाशिव (साने गुरुजींचे वडील) ह्यांच्या काळात आर्थिक स्थिति घसरत गेली. आणि घर-दार आणि जमिनी जप्त झाल्यामुळे राहण्याची सोय देखील नाहीसी झाली. अशा गरिबीच्या परिस्थितीत यशोदाबाई सोने ह्यांनी पाडूरंग म्हणजेच साने गुरुजींना जन्म दिला. साने गुरुजींच्या कुटुंबात सात पाच भावंड, आई-वडील आणि दुर्वांची आजी ह्या नावाने प्रसिद्ध असलेली त्यांची आई असे आठ जण होते.





साने गुरुजींचे प्राथमिक शिक्षण हे पालगडलाच झाले. आणि माध्यमिक शिक्षण हे पुणे तसेच दापोलीतील मिशनरी स्कूल मध्ये झाले. 1918 मध्ये मॅट्रिक पर्यन्त शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी न्यू- पुना कॉलेजमध्ये पुढील शिक्षणाची वाटचाल केली. न्यू पुना कॉलेज सध्या सर परशुराम भाऊ महाविद्यालय म्हणून प्रसिद्ध आहे. पुढे येथूनच गुरुजींनी इंग्रजी साहित्यात एम.एची पदवी मिळवली.


एम.ए ची पदवी मिळवल्यानंतर साने गुरुजींनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूलमध्ये एकूण 6 वर्षे शिक्षकाची नोकरी केली. त्यांनी वसतिगृहाची जबाबदारी देखील सांभाळली. आणि, वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वावलंबन व सेवावृत्तीचे धडे शिकवले. तेथूनच त्यांनी ‘विद्यार्थी’ नावाचे लिहिण्याची सुरुवात केली. पुढे त्यांनी अमोल गोष्टी, कर्तव्याची हाक, कला म्हणजे काय? क्रांती, गुरुजींच्या गोष्टी. अशी अनेक पुस्तके लिहिली. 'श्यामची आई' हे पुस्तक त्यांनी नाशिक येथील तुरुंगात लिहिले.








श्यामची आई book review- marathi book shyamchi aai story in marathi








श्यामची आई हे एक उत्कृष्ट मराठी पुस्तक आहे. हे पुस्तक ब्रिटिश काळात महाराष्ट्रातील ग्रामीण भागात वसलेल्या ब्राम्हण कुटुंबातील साने गुरुजींचे आत्मचरित्र आहे. जेवढी प्रसिद्धी साने गुरुजींना त्यांचा जीवनात चांगल्या कार्यामुळे मिळाली आहे तेवढीच प्रसिद्धी साने गुरुजींच्या श्यामची आई ह्या पुस्तकाला मिळाली आहे. साने गुरुजींचे  हे पुस्तक वाचत असतांना तुम्ही मंत्रमुग्ध करणार्‍या जीवनप्रवासाचा आनंद घ्याल.


पुस्तकात केले गेलेले निसर्गाचे वर्णन हे अप्रतिम आहे. शब्दांची रचना अतिशय सुंदर असल्याने पुस्तकात वर्णन केले गेलेले निसर्ग हे जीवनाचा अतूट भाग वाटते. पुस्तकातील जग आणि प्रसंगाचे वर्णन हे काल्पनिक नाही, साने गुरुजींनी त्यांचे सुंदर बालपण ह्यात हुबेहूब उतरवले आहे. साने गुरुजींचे आणि त्यांच्या आईचे नातेसंबंधाचे वर्णन ह्यात केलेले आहे. 


आईवरील प्रेम आणि भक्ति साने गुरुजींनी ह्या पुस्तकात दर्शवली आहे. आईच्या शिकवणीचा त्यांचावर फार मोठा प्रभाव होता. आईने त्यांचा मनावर जे काही संस्कार दिले त्यांचामुळे गुरुजींचा जीवनात खूप मोठा विकास झाला. आईने दिलेले संस्कार कशाप्रकारे त्यांचा जीवनात उतरले आणि त्यांचे जीवन घडवण्यास मदत झाली हा प्रवास तुम्हाला ह्या पुस्तकात पाहावयास मिळेल. माझी आई ही देवापेक्षा कमी नाही असे गुरुजींचे म्हणणे आहे. त्यांचा जीवनात विकासाचे बी हे त्यांच्या आईनेच पेरले आणि प्रत्येक यश हे आईमुळे प्राप्त झाले असे साने गुरुजींचे म्हणणे आहे.

 

ह्यातील प्रकरण तुम्हाला कोकणातील जीवनशैली तसेच सह्याद्रीच्या पर्वतरांगांचे दर्शन घडवून देते. ह्यातील कथन हे अतिशय रचनात्मक तसेच सोप्या पद्धतीचे आहे. हे वाचकांना गुंतवून ठेवते. साने गुरुजींचे आई-वडील आणि भावंड ह्यांच्यातिल संवाद अतिशय प्रेमळ आहे. एखादा व्यक्ति जरी गरीब असला तरी तो प्रेमाने श्रीमंत असू शकतो. -असे साने गुरुजींच्या कुटुंबाचे वर्णन आहे.


पुस्तकातील जे काही चॅप्टर्स (धडे,अध्याय) आहेत त्यांना 'रात्र' असे म्हटले गेले आहे.अशा एकूण 42 रात्रींची गोष्ट ह्या पुस्तकात आहे.


ह्या पुस्तकात ज्या काही रात्र म्हणजेच 'धडे किंवा अध्याय' आहेत ते पुढील प्रमाणे:-


प्रारंभ

  1. रात्र पहिली : सावित्री व्रत
  2. रात्र दुसरी : अक्काचे लग्न
  3. रात्र तिसरी : मुकी फुले
  4. रात्र चौथी : पुण्यात्मा यशवंत
  5. रात्र पाचवी : मथुरी
  6. रात्र सहावी : थोर अश्रू
  7. रात्र सातवी : पत्रावळ
  8. रात्र आठवी : क्षमेविषयी प्रार्थना
  9. रात्र नववी : मोरी गाय
  10. रात्र दहावी : पर्णकुटी
  11. रात्र अकरावी : भूतदया
  12. रात्र बारावी : श्यामचे पोहणे
  13. रात्र तेरावी : स्वाभिमान-रक्षण
  14. रात्र चौदावी : श्रीखंडाच्या वड्या
  15. रात्र पंधरावी : रघुपति राघव राजाराम
  16. रात्र सोळावी : तीर्थयात्रार्थ पलायन
  17. रात्र सतरावी : स्वावलंबनाची शिकवण
  18. रात्र अठरावी : अळणी भाजी
  19. रात्र एकोणिसावी : पुनर्जन्म
  20. रात्र विसावी : सात्त्विक प्रेमाची भूक
  21. रात्र एकविसावी : दूर्वांची आजी
  22. रात्र बाविसावी : आनंदाची दिवाळी
  23. रात्र तेविसावी : अर्धनारी नटेश्वर
  24. रात्र चोवीसावी : सोमवती अवस
  25. रात्र पंचविसावी : देवाला सारी प्रिय
  26. रात्र सव्विसावी : बंधुप्रेमाची शिकवण
  27. रात्र सत्ताविसावी : उदार पितृहृदय
  28. रात्र अठ्ठाविसावी : सांब सदाशिव पाउस दे
  29. रात्र एकोणतिसावी : मोठा होण्यासाठी चोरी
  30. रात्र तिसावी : तू वयाने मोठा नाहीस
  31. रात्र एकतिसावी : लाडघरचे तामस्तीर्थ
  32. रात्र बत्तिसावी : कर्ज म्हणजे जिवंतपणीचा नरक
  33. रात्र तेहतिसावी : गरिबांचे मनोरथ
  34. रात्र चौतिसावी : वित्तहीनाची हेटाळणी
  35. रात्र पस्तिसावी : आईचे चिंतामय जीवन
  36. रात्र छत्तिसावी : तेल आहे तर मीठ नाही
  37. रात्र सदतिसावी : अब्रूचे धिंडवडे
  38. रात्र अडतिसावी : आईचा शेवटचा आजार
  39. रात्र एकोणचाळिसावी : सारी प्रेमाने नांदा
  40. रात्र चाळिसावी : शेवटची निरवानिरव
  41. रात्र एकेचाळिसावी : भस्ममय मूर्ती
  42. रात्र बेचाळिसावी : आईचे स्मृतिश्राद्ध

 

 







Shyamchi Aai Marathi PDF summery

श्यामची आई मराठी pdf मध्ये एकूण 231 पान आहेत. ज्यात पहिल्या दहा पानांपर्यंत पुस्तकाविषयी आणि साने गुरुजींविषयी माहिती देण्यात आली आहे. साने गुरुजींची थोडक्यात चरित्र सुरुवातीच्या काही पानांत देण्यात आले आहे. त्यानंतर धड्यांची सुरुवात होते. शेवटी खरा तो एकचि धर्म ह्या मराठी प्रार्थना गीतापासून पुस्तकाचा शेवट होतो.

 

Shyamchi aai marathi pdf free download

तुम्हाला हे पुस्तक वाचायचे असल्यास तुम्ही खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करून श्यामची आई पीडीएफ पुस्तक डाऊनलोड करू शकता.

 

पुस्तकाचे नाव:- श्यामची आई

लेखक:- साने गुरुजी

भाषा:- मराठी

प्रकाशन:- साहित्य प्रतिष्ठान

Download PDF

 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

पेज