Breaking

Friday, 4 March 2022

Blog Writing in Marathi-मराठी ब्लॉग रायटींग कशी करावी? ब्लॉग कसा लिहावा? - Marathi Krupa

How to Start blog writing in marathi?- Blog Writing format in Marathi


Blog writing in Marathi:- मित्रांनो, blog writing विषयी तुम्ही ऐकलेच असेल. वेबसाइट किंवा ब्लॉग सुरू करून पैसे देखील कमावले जातात, हे तुम्हाला माहिती असेलच. आणि त्यामुळे तुमच्या मनात देखील ब्लॉग लिहण्याची इच्छा झाली असेल. खुप लोक ब्लॉग सुरू करण्याचा निर्णय घेतात. आणि, ब्लॉग कशाप्रकारे लिहावा? हे त्यांना माहिती नसल्याने अर्ध्यातच ब्लॉगिंग करणे सोडून देतात.

परंतू, आम्ही तुमच्यासाठी मराठी ब्लॉग रायटींग कशाप्रकारे करावी? ह्याविषयी संपूर्ण माहिती घेऊन आलो आहोत. ह्या लेखात मराठीमध्ये ब्लॉगपोस्ट किंवा ब्लॉगरायटींग कशाप्रकारे केली जाते? ह्याविषयी संपूर्ण माहिती टिप्स-ट्रिक्स सह तुम्हाला देण्यात आली आहेहे लेख वाचून तुम्ही वाचकांसाठी आकर्षक आणि सर्च इंजिन साठी seo friendly लेख(article) लिहू शकाल. चला तर पाहुयात!  

 


Blog Writing in Marathi-मराठी ब्लॉग रायटींग
Blog Writing in Marathi-मराठी ब्लॉग रायटींग

 




What is blog writing in Marathi? Marathi blog writing म्हणजे काय?

 

जेव्हा आपण ब्लॉगिंग करतांना एखादा लेख ब्लॉगवर प्रकाशित करतो. त्यालाच blogpost असे म्हटले जाते. blogpost हे ब्लॉगरद्वारे लिहिले गेलेले एक लेख असते जे ब्लॉग वर प्रकाशित केले जाते.

उदा. हे लेख तुम्ही वाचत आहात हे एक ब्लॉगपोस्ट आहे. ज्याला, माझ्याद्वारे प्रकाशित केले गेले आहे. त्यामुळे तुम्ही मला ब्लॉगर म्हणू शकता.

 ब्लॉग रायटींग म्हणजे ब्लॉगपोस्ट तयार करताना केलेले लेखन.

 



What is blogpost in marathi? ब्लॉगपोस्ट म्हणजे काय?

Blog Writing करण्याअगोदर तुम्हाला ब्लॉगपोस्ट कशास म्हणतात? याविषयी देखील माहिती असायला हवे.

ब्लॉग ही एक अशी डायरी किंवा जर्नल्स असतात ज्यांना वारंवार अपडेट केले जाते. ब्लॉगवर नवनवीन लेख लिहिणे, आणि वेळोवेळी माहिती अपडेट करून आपल्या वाचकांपर्यंत योग्य माहिती पोहचवण्यात येते. ह्यासाठी आपण जे काही नवीन लेख लिहितो त्यास ब्लॉगपोस्ट म्हणतात. ब्लॉगवर किंवा वेबसाइटवर लिहिल्या जाणार्‍या लेखास ब्लॉगपोस्ट म्हणतात.

 




Blog writing platform in marathi- Blog writing कोणत्या प्लॅटफॉर्मवर करावी?


blog writing in marathi


तुम्हाला जर Blogpost लिहून प्रकाशित करायचे असल्यास तुम्हाला ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मविषयी माहिती असणे आवश्यक आहे. तुमचे लेखन जगासमोर शेअर करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठी काही ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म खाली सुचवले आहेत. ह्या ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म वर तुम्ही मोफत अकाऊंट तयार करून ब्लॉगिंग करू शकता. अकाऊंट तयार करण्यासाठी तुम्हाला ईमेल आयडी ची गरज पडू शकते.

 

Blogger.com, Wix.com, Thumblr.com, Weebly.com, Wordpress.com, Medium.com.


तुम्ही मराठी, हिन्दी, किंवा इतर भाषेत ब्लॉग लिहू इच्छित असाल तर, तुम्हाला थोडी-फार typing येणे आवश्यक आहे. तुम्ही ब्लॉगपोस्ट तयार करतांना ms word ह्या प्रोग्राम मध्येच पोस्ट लिहा. त्यानंतर, ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म जसे की- blogger, wordpress ह्यांवर पब्लिश करू शकता. तुम्ही मोबाइल वर ब्लॉग लिखाण करत असाल तर, मोबाइल मधील notes हे अॅप्लिकेशन वापरा. हिंदीत किंवा मराठीत ब्लॉगपोस्ट लिहिण्यासाठी तुम्ही Indic language typing tool तुमच्या लॅपटॉप किंवा संगणकात इंस्टॉल करू शकता. 

 

 

 

 

 

 

how to write blogpost in marathi step-by-step? मराठी ब्लॉग कशाप्रकारे लिहावा?

 

ब्लॉगपोस्ट लिहिण्यासाठी म्हणजेच Blog Writing करण्यासाठी तुम्हाला खालील स्टेप दिल्या आहेत त्यांना नक्की फॉलो करा.

 

 

 

 

टॉपिक निवडा

ब्लॉगपोस्ट लिहितांना सर्वात मोठी अडचण ही टॉपिक म्हणजेच लिखनाचा विषय निवडणे ही आहे. आपण सहजपणे आणि मनाने कोणत्याविषयावर लिहू शकतो अशाच विषयवार ब्लॉग लिहा. खरतर संपूर्ण ब्लॉग हा आपल्या आवडत्या विषयावर तयार केला असेल तर तुम्ही ब्लॉगिंग करतांना कधीच कंटाळणार नाही.  



Keyword Research करा.

किवर्ड रिसर्च हे ब्लॉगिंगसाठी महत्वाचे असते. ह्या प्रोसेसद्वारे आपण Search Engine मध्ये सर्वात जास्त सर्च केल्या जाणार्‍या keywordsला शोधतो आणि त्यानुसार Blog Writing करतो. चांगल्या प्रकारे keyword research केल्याने ब्लॉगवर ट्रॅफिक वाढवण्यास मदत होते.

Keyword researchही फ्री टूल आणि पेड टूल द्वारे केली जाते. तुम्ही यूट्यूबवर keyword research कशाप्रकारे केली जाते, याविषयी माहिती पाहू शकता.



Title- शीर्षक द्या.

आकर्षक title म्हणजेच, शीर्षक निवडल्यास सर्च इंगिनवर त्याचा चांगला प्रभाव पडतो. ज्यामुळे ब्लॉगवर ट्रॅफिक येण्यास मदत होते. वाचक जर त्यांचा पाहिजे असलेल्या विषयावर सर्च करतील आणि तुमच्या ब्लॉगचे शीर्षक त्यास आकर्षक वाटल्यास, ते नक्की तुमच्या ब्लॉगवर येतील.

 


आउटलाइन (रूपरेषा) तयार करा.

एक चांगले ब्लॉगपोस्ट हे प्रत्येक घटकाची माहिती देणारे असावे. त्यामुळे अगोदरच ब्लॉगपोस्टची रुपरेषा म्हणजेच आराखडा तयार केल्याने तुम्हाला ब्लॉगपोस्ट लिहिणे सोपे जाईल. आणि, प्रत्येक घटकाविषयी थोडी-फार माहिती तुम्ही लिहू शकाल. आराखडा तयार करताना तुम्ही सुरूवातीस introduction, main paragraph, एकूण heading, sub-heading हयांविषयी रिसर्च करा, पोस्ट लिहिताना वापरण्यात येतील असे प्रश्न शोधा व त्यांना ब्लॉगपोस्ट मध्ये वापरा. अशा प्रकारचा आराखडा तयार केल्यास पोस्ट लिहिणे सोपे जाते.

 

Paragraph सुटसुटीत लिहा.

प्रत्येक परिच्छेद हा तीन-चार ओळींत पूर्ण करा. आणि त्यांत योग्य व्याकरणाचा आणि शब्दरचनेचा वापर करा.

 

आकर्षक शब्द किंवा वाक्यांचा वापर करा.

तुमच्या ब्लॉगवर येणार्‍या वाचकांचे लक्ष वेधण्यासाठी आकर्षक वाक्यांचा वापर करा. ज्याने वाचकाला कंटाळा येत नाही. आणि ते उत्सुकतेने ब्लॉगपोस्ट वाचत असतात. तुमच्या लेखात धक्कादायक विधाने द्या, विविध जोक्स वापरा, म्हणी वापरा. अशा प्रकारे तुम्ही वाचकांमध्ये तुमची वेगळी ओळख निर्माण करू शकता.

 

ब्लॉगपोस्ट मध्ये फोटोंचा वापर करा.

फोटो किंवा इमेजेस चा वापर केल्याने कोणत्याही गोष्टीविषयी लवकर कळण्यात मदत होते. ब्लॉगपोस्टमध्ये फक्त शब्दांचा वापर केल्यास ते थोडे कंटाळवाणे वाटते. फोटो किंवा इमेजचा समावेशाने लेख सूटसुटीत आणि आकर्षक वाटते. एखाद्या मुद्द्याविषयी माहिती वाचकांना पटकन समजवण्यासाठी तुम्ही फोटोचा वापर करू शकता.

 

ब्लॉगपोस्ट मधील लेखन हे यूजर फ्रिएंडली ठेवा.

ब्लॉगपोस्ट हा माहिती देणारा आणि वाचनास मजेशीर भाग असतो. इंटरनेटवर प्रत्येक विषयावर माहिती आपणास मिळून जाते. एकाच टॉपिकवर कित्येक ब्लॉगपोस्ट लिहिले गेले आहेत. परंतु, जे ब्लॉग तांत्रिक लेखनावर भर न देता यूजर फ्रेंडली ब्लॉगपोस्ट लिहिता ते सर्च इंगिनवर रॅंक करतात. येथे, तांत्रिक लेखन म्हणजे कठीण समानार्थी शब्द वापरणारे असे समजावे. आणि, यूजर फ्रेंडली म्हणजे अतिशय सोप्या शब्दांतील लेखन. तुम्ही वाचकास समजता येईल अशा सोप्या भाषेत ब्लॉगपोस्ट लिहावे. ज्याने वाचन करणार्‍यास त्याचा प्रश्नांची उत्तरे मिळेल.

 

 



 

blog writing format in Marathi- ब्लॉगपोस्ट चा आढावा.


Blog writing in marathi



Headline

सुरूवातीस तुमच्या ब्लॉगपोस्ट ला हेडिंग द्या. ज्याला title(शीर्षक) देखील म्हणता येईल. लेखास आकर्षक असे शीर्षक द्या. आणि, त्यामध्ये कीवर्ड चा समावेश करा. ज्याने सर्च इंजिन ओप्टिमैजेशन करण्यास मदत होते.

 

Introduction

ब्लॉगपोस्टला शीर्षक दिल्यानंतर सुरूवातीस परिच्छेदात ब्लॉगपोस्टमध्ये कशासंबंधी माहिती देण्यात आली आहे ते संक्षिप्त रूपात लिहा. ह्यामध्ये देखील कीवर्डचा समावेश करा. 100-150 शब्दांपर्यंत introduction लिहा. आणि त्यानंतर ब्लॉगपोस्ट लिहायला सुरुवात करा.

 

heading

यानंतर एक हेयडिंग द्या. आणि, यातही कीवर्डचा समावेश करा.

 

main paragraph

आता, ब्लॉगपोस्टचा मुख्य भाग लिहायला सुरुवात करा. ह्यात महत्वाच्या मुद्द्यांचा समावेश करा. त्यासाठी अतिशय सोपी भाषा वापरा.

 

conclusion

तुमचे ब्लॉगपोस्ट लिहिले गेल्यावर सर्वात शेवटी conclusion म्हणजेच निष्कर्ष लिहा. ह्यात तीन-चार ओळींत ब्लॉगपोस्ट मध्ये लिहीलेल्या मुद्द्यांचा आढावा घ्या. येथेदेखील कीवर्ड चा उपयोग केला तर चांगले.

 

 




हे देखील पहा:-

OYO म्हणजे काय? OYO meaning in Marathi. OYO चे फायदे.

 

 




 

 

 

तर मित्रांनो ह्या लेखात एवढेच. आम्हाला आशा आहे की blog writing in Marathi- मराठी ब्लॉग रायटींग कशी करावी? ह्या लेखात तुम्हाला ब्लॉगपोस्ट कसे लिहावे ह्याविषयी संपूर्ण माहिती मिळाली असेल. जर तुम्हाला हा लेख उपयोगी आला असेल तर ह्यास नक्की शेअर करा. तुम्हाला काही शंका असल्यास आम्हाला कमेंट मध्ये विचारा. आणि त्याचे उत्तर नक्की देऊ. धन्यवाद@ 






 

 

 

No comments:

Post a Comment

Post Top Ad

पेज