hacking in marathi?
Hacking in Marathi:-आजच्या युगात सर्व कामात कॉम्प्युटर आणि मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. लोक त्यांची कामे कम्प्युटर किंवा स्मार्टफोनशिवाय पूर्णच करू शकत नाही. तुम्ही स्वत:चा व्यापार असो किंवा इतर कंपनी किंवा बँकमध्ये काम करत असाल, तुम्हाला कम्प्युटरची गरज भासते.
डिजिटल उपकरणे जितकी उपयोगी आहेत तितकीच धोकदायक सुद्धा. प्रत्येकाकडे काहीन्-काही डेटा असतो जो त्यांच्या कम्प्युटर किंवा मोबाइल मध्ये साठवलेला असतो. फोटो, व्हिडीओ, टेक्स्ट फाइल्स आणि तुमची स्वतःची माहिती तुमच्या कॉम्प्युटर किंवा मोबाईलमध्ये साठवली जाते. बँकिंग, शेअर बाजार, मोठ्या कंपन्या, शाळा, महाविद्यालये आणि वैयक्तिक काम- अशा सर्वच क्षेत्रात संगणकाचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. हॅकर्स हा डेटा चोरतात आणि लोकांना किंवा कंपन्यांना ब्लॅकमेल करतात, तसेच पैशांची मागणी करतात किंवा महत्त्वाचा असल्यास तो डिलीट करून देतात. तसेच, ते इंटरनेटवर डेटा लीक करून गुप्त माहिती सर्वांसमोर आणतात.
हे सर्व सायबर क्राईमच्या आधारे रोखले जाऊ शकते. पण काही हॅकर्स इतके हुशार असतात की ते सहज नाहीसे होतात. कोणत्याही व्यक्तीची किंवा कंपनीची वैयक्तिक माहिती चोरणे याला सायबर गुन्हा म्हणतात. आणि हे हॅकिंगद्वारे केले जाते. आज आपण या हॅकिंगबद्दल जाणून घेणार आहोत.
हॅकिंग म्हणजे काय? What is hacking in marathi?
हॅकिंग म्हणजे दुसर्या व्यक्तीच्या संगणक किंवा इतर डिजिटल सिस्टिममध्ये कमतरता शोधणे आणि त्यांच्या सिस्टिमचे संपूर्ण मिळवणे, तसेच त्यांच्या डेटाची चोरी किंवा छेडछाड करण्यासाठी सिस्टमचा वापर करणे. आणि हॅकिंग करणाऱ्या व्यक्तीला हॅकर म्हणतात. हे हॅकर्स डेटा चोरतात, लोकांना ब्लॅकमेल करतात आणि त्यांच्याकडून मोठ्या रकमेची मागणी करतात.
हॅकर अशी व्यक्ती असते ज्याला प्रोग्रामिंग, अल्गोरिदम, नेटवर्क, डिजिटल सुरक्षा यांचे चांगले ज्ञान असते आणि तीच माहिती हॅकिंगसाठी वापरली जाते.
संगणक, स्मार्टफोन, ऑपरेटिंग सिस्टम, टॅब्लेट आणि अगदी संपूर्ण नेटवर्क/सर्व्हर इ. डिजिटल उपकरणांशी छेडछाड करणे याला आपण 'हॅकिंग' म्हणू शकतो. आपल्याकडे जेवढे डिजिटल उपकरणे असतील तितका जास्त धोका हॅकिंग किंवा सायबर सुरक्षिततेचा असतो.
Types of hacker- हॅकरचे प्रकार
हॅकर्सचे प्रकार हे त्यांच्या कामानुसार पडतात. जसे की- चांगले हॅकर जे इतरांना मदत करतात, गुन्हेगार हॅकर जे इतरांना धोका पोहचवण्यासाठी हॅकिंग करतात, इत्यादि कामांद्वारे हॅकिंगचे प्रकार पडतात. त्यांपैकी काही विशेष प्रकार आपण पाहूयात.
ब्लॅक हॅट
ब्लॅक हॅट हॅकर्स चुकीच्या उद्देशानेकिंवा गुन्हेगारी हेतूने कोणत्याही सिस्टमशी छेडछाड करतात. ब्लॅक हॅट हॅकर्सला ‘क्रिमिनल हॅकर्स’ देखील म्हणतात. त्यांच्याकडे हॅकिंगचे प्रचंड ज्ञान आहे. ज्याद्वारे ते सायबर सुरक्षेवर देखील हल्ला करतात. सायबर क्राइम विभागापासून लपून बसणे हे त्यांचे एक वैशिष्ट्य आहे. या प्रकारचे हॅकर्स लोकांना ब्लॅकमेल करणे, आर्थिक फायदा घेणे, बदनामी करणे इत्यादी उद्देशाने हॅकिंग करतात.
ग्रे हॅट
ग्रे हॅट हॅकर हा सायबर सुरक्षा तज्ज्ञ असल्याचं म्हटलं जातं. या प्रकारचे हॅकर्स "चांगले" आणि "वाईट" ह्या दोघा गटांत येतात. हे हॅकर्स परवानगीशिवाय सिस्टममधील असुरक्षा शोधतात आणि त्यात प्रवेश करतात, परंतु चांगल्या उद्देशाने. ते बेकायदेशीरपणे हॅकिंग करतात, परंतु एखाद्याला ब्लॅकमेल करणे किंवा डेटा चोरणे यासारखे कोणतेही चुकीचे काम करत नाहीत. त्यांचा हेतू बेकायदेशीरपणे कमतरता तपासणे हा असतो. कोणी चुकीचे काम करत असल्याचे त्यांना समजले, तर ते परवानगी न घेता त्यांची यंत्रणा हॅक करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे ह्यांना ‘ग्रे हॅट हीरो’ देखील म्हणतात.
व्हाइट हॅट
व्हाईट हॅट हॅकर्स हे ब्लॅक हॅट हॅकर्स सारखेच असतात, पण चुकीच्या पद्धतीने काम करत नाहीत. व्हाईट हॅट हॅकर हा एक हॅकर आहे जो सिस्टममधील कमतरता शोधतो आणि सिस्टमला ब्लॅक हॅट हॅकर्सपासून संरक्षित कसे करतात येईल याची माहिती देतो. असे हॅकर्स कायदेशीररित्या हॅकिंग करतात. ते संगणकाच्या सर्व क्षेत्रातील डेटाचे संरक्षण करण्यासाठी तसेच सायबर सुरक्षा हल्ल्यांपासून संरक्षण करण्यासाठी काम करतात. ते ब्लॅक हॅट हॅकर्ससारखे विचार करतात आणि तसेच काम करतात. त्याद्वारे, कोणत्याही यंत्रणेतील कमकुवतपणा शोधून त्या दुरुस्त केल्या जातात.
रेड हॅट हॅकर्स
रेड हॅट हॅकर हे ब्लॅक हॅट हॅकर्सला रोकण्यासाठी आक्रमकपणे काम करतात. हे वाईट नसले तरी, वाईट काम करणार्या हॅकर्सला रोखण्यासाठी बेकायदेशीरपणे काम करतात. ते ग्रे हॅट हॅकर्ससारखेच आहेत. ब्लॅक हॅट हॅकर्सला रोखण्यासाठी हे त्यांचे सर्वर निकामी करतात. ह्यांना virtual जगाचे रॉबिन हूड असे म्हटले जाते.
ब्लू हॅट हॅकर्स
ब्लू हॅट हॅक कंपनीच्या नवीन डिजिटल प्रॉडक्ट्समध्ये त्रुटी शोधण्याचे काम करतात. ते सिस्टीमची सुरक्षा तपासतात आणि कोणतीही समस्या आल्यावर त्याचे निराकरण करतात. हे हॅकर्स सिस्टमसुरक्षा वाढवण्यास मदत करते. या कामासाठी कंपनी ब्ल्यु हॅट हॅकर्सला भरपूर पैसे देते. हे ब्लॅक हॅट हॅकर्सपासून सिस्टमला वाचवण्याचे काम करतात.
स्क्रिप्ट किडीज
स्क्रिप्ट किडीज हा सामान्य प्रकारचा हॅकर आहे, या लोकांना संगणक कसा वापरायचा याचे फार कमी ज्ञान असते. परंतु हे हॅकर्स सिस्टीममध्ये प्रवेश करण्यासाठी आणि महत्त्वाच्या फाइल्समध्ये प्रवेश करण्यासाठी आणि डेटा चोरण्यासाठी सुप्रसिद्ध आहेत. हे सोप्या तंत्रांचा वापर करतात. हॅकिंगमधील छोट्या-छोट्या कामासाठी हे यूट्यूब किंवा गूगल सर्चद्वारे माहिती घेतात व त्यानंतर हॅकिंगचा प्रयत्न करतात.
How to learn hacking? हॅकिंग कसे शिकायचे? हॅकर कसे व्हावे?
आता तुम्हाला हॅकिंगचे प्रकार कळाले असेल,तुम्हाला कळले असेल की कोणत्या प्रकारचे हॅकर हे योग्य असतात. तुम्हाला निश्चितच व्हाइट हॅट हॅकर बनायचे असेल. आता प्रश्न असा की तुम्ही कुठून हॅकिंग शिकू शकता? आणि चांगल्या प्रकारे हॅकिंग करू शकतात.
हॅकिंग ची कला ही भविष्यात खूप फायद्याचे ठरणार आहे. न्यू यॉर्क टाइम्स च्या एक आर्टिकलनुसार हॅकिंग हा सायबर सेक्युरिटीचा एक अधिकृत भाग असणार आहे. त्यामुळे हॅकिंग शिकल्याने भविष्यात चांगल्या करियरची संधी उपलब्ध होऊ शकते.
हॅकिंग शिकण्यासाठी तुम्हाला त्यामध्ये वापरण्यात येणार्या टूल्स विषयी माहिती थोडी-फार माहिती असावी. तुम्ही विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म जसे udemy, upgrad ह्यांद्वारे हॅकिंग शिकू शकतात. तसेच, ऑफलाइन क्लास जॉइन करू शकतात. हॅकिंग शिकण्यासाठी तुम्हाला काही महीने किंवा वर्ष देखील लागू शकतात. ह्यासाठी शिकण्याची जिद्द असायला हवी.
तुम्हाला हॅकिंगचे थोडेही ज्ञान नसल्यास तुम्ही नेटवर्क, वायरस, फायरवॉल, आयपी अॅड्रेस अशा घटकांविषयी माहिती घ्यावी. त्यांनतर हॅकिंगची सुरुवात करावी. हॅकिंग करताना प्रोग्रामिंग स्किल चे खूप महत्व आहे. तुम्हाला Php आणि java ह्या कोडिंग लॅंगवेजचे ज्ञान असायला हवे.
हॅकिंग करण्यासाठी प्रामुख्याने LINUX हे ऑपरेटिंग सिस्टम वापरले जाते. कारण, ह्यामध्ये अशाप्रकारचे टूल्स तसेच सॉफ्टवेअर असतात ज्याद्वारे हॅकिंग करणे सोपे जाते. तुम्ही अगोदर ह्या सिस्टमचा वापर करणे सुरुवात करा. ज्याने तुम्हाला हॅकिंग शिकतांना अडचण जाणवणार नाही.
Best hacking course-हॅकिंग शिकण्यासाठी सर्वोत्तम ऑनलाइन कोर्स
तुम्ही हॅकिंग कसे शिकू शकता ते आपण वरील परिच्छेदात पाहिले. आता, हॅकिंगचे काही कोर्स जे ऑनलाइन आहेत त्याविषयी आपण माहिती पाहुयात.
Ethical Hacking – Basics (Kali 2021) – Udemy
Edureka Cyber Security course
Fundamentals of Computer Hacking – Udemy
Introduction to Ethical Hacking – Great Learning
Learn Ethical Hacking and Penetration Testing Online – Udemy
FAQ-
हॅकर म्हणजे काय?
हॅकर हे कम्प्युटर सेक्युर्टी एक्सपर्ट असतात. जे चांगल्या किंवा वाईट कामासाठी हॅकिंगचा उपयोग करतात.
Cracker कशास म्हणतात?
जे हॅकर्स बेकायदेशिरपणे हॅकिंग करतात त्यांना ब्लॅक हॅट हॅकर म्हणतात. आणि ह्या प्रकारच्या हॅकरलाच cracker म्हणून ओळखले जातात.
मी माझा संगणक हॅक होण्यापासून कसा सुरक्षित करू?
तुमच्या संगणकात एक चांगला अँटीव्हायरस आणि फायरवॉल इंस्टॉल केल्यास तुम्ही तुमचा संगणक हॅक होण्यापासून वाचवू शकता.
Who is best hacker in Maharashtra?
1. Benild Joseph, 2.Vivek Ramachandran, 3.Ankit Fadia.
No comments:
Post a Comment